जळगाव शहर
हॅट्स ऑफ जळगाव जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी!
जळगाव । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून 'रेड' आणि 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान-मोठे धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामावरील संकट टळले असून बळीराजा सुखावला आहे. अनेक ठिकाणी पूर आला, तर काही भागात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली; मात्र या सर्व संकटात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठामपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. सर्वांची एकजूट आणि तत्परतेमुळे मदतकार्य अत्यंत वेगाने पार पडले.
4 दिवस पूर्वी👁 219