जळगाव शहरातील तळले कॉलनी परिसरात ‘संगीतमय श्रीमद् भागवत कथा’ निमित्त 23 मे रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कै. रूपचंद चावदस चौधरी, कै. सौ. सुनंदा कैलास चौधरी आणि कै. कुंदन सुधीर चौधरी यांच्या स्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कैलास रूपचंद चौधरी यांच्या वतीने तळले कॉलनी, जुना खेडी रोड, जळगाव येथे कार्यक्रम सुरू आहे.

या भागवत कथेचे प्रवचन ह.भ.प. मंगेश महाराज वराडे दाताळकर करीत आहेत. त्यांच्या प्रभावी निरूपणामुळे कथा श्रवणासाठी भाविकांना विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. दररोज दुपारी 12.30 ते 4 या वेळेत कथा होणार असून सकाळी व सायंकाळी काकड आरती आणि हरिपाठाचे आयोजनही करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास 17 मेपासून सुरुवात झाली असून 24 मे 2026 रोजी समारोप होणार आहे. या काळात भजन, हरिपाठ आणि कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

23 मे रोजी सायंकाळी 4 वाजता दिंडी सोहळा होईल. तर 24 मे रोजी सकाळी 9 वाजता कालयाचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव मित्र मंडळ, तरुण कुणबी मित्र मंडळ आणि तळले कॉलनी मित्र मंडळ यांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभत आहे.

परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.